परिणीता सोशल फाऊंडेशन आयोजित, तोडकर संजीवनी प्रा.लि प्रायोजित तसेच टीआयपीएल प्रायोजित परिणीता सखी सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न
पनवेल दि.०९(संजय कदम): प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परिणीता सोशल फाऊंडेशन आयोजित, तोडकर संजीवनी प्रा.लि प्रायोजित तसेच टीआयपीएल, पनवेल सह प्रायोजित परिणीता सखी सन्मान पुरस्कार सोहळा पनवेलच्या गोखले सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ मा.स्वागत तोडकर, जे बी एस पी संस्थेच्या डिरेक्टर मेंबर, सीकेटी स्कुलच्या कमिटी मेंबर आणि बीसीटी कॉलेज ऑफ लॉच्या कमिटी मेंबर तसेच पनवेल मधील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या मा. अर्चना ठाकूर, लायन्स क्लब पनवेल, ऑक्सिलेरी क्लबच्या लायनलेडी मा.दिपा मोहिनी मुकेश, आंतरराष्ट्रीय किर्तिच्या अॅस्ट्रोलॉजर मा.डॉ.शिबानी कासुल्ला, इंडिया फॅशन आयकॉनच्या रनअरअप मा. सरोज पवार, अभिनेता आणि कोरिओग्राफर अभिषेक शिंदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.              कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख अतिथिंच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. परिणीता सोशल फाऊंडेशनच्या रायगड जिल्हा प्रमुख स्मिता जोशी यांनी उपस्थितांचे पनवेल आणि रायगडकरांच्यावतीने स्वागत केलं. यावेळी उपस्थित पनवेल मधील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या मा. अर्चना ठाकूर म्हणाल्या, की इतक्या कमी कालावधीत परिणीता संस्थेने मारलेली गगनभरारी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. हा सोहळा पनवेलमध्ये होत असल्याचा एक स्थानिक म्हणून मला नक्कीच अभिमान वाटतो. लायन्स क्लब पनवेल, ऑक्सिलेरी क्लबच्या लायनलेडी मा.दिपा मोहिनी मुकेश म्हणाल्या, स्त्रीयामधला आत्मविश्वास हा त्यांच्यातली खरी ताकद असते, व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या स्त्री यांचा आम्हाला अभिमान वाटतो, परिणीता सखी सन्मान मिळालेल्या सर्व उद्योजिका मैत्रिणींचे मनापासून स्वागत.. आंतरराष्ट्रीय किर्तिच्या अॅस्ट्रोलॉजर मा.डॉ.शिबानी कासुल्ला म्हणाल्या, आपल्या जन्माचं खरं उद्दिष्ट कळणं आणि आपली वाटचाल होणं हे खूपच महत्वाचं असतं, ज्योतिष किंवा अन्यशास्त्रांच्या वापर आपल्याला योग्य पद्धतीने नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो मात्र त्यासाठी अभ्यास असणं महत्वाचं आहे.


 मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी यावेळी त्यांच्या अभिनय कारकिर्दित पावलापावलावर स्त्रीयांचा असलेला सहभाग, मार्गदर्शन आणि सहकार्य किती मोलाचं होतं हे विशद केलं, तसेच स्त्रीयांवरील अन्यायकारक प्रथा परंपराचा कडाडून विरोध झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सावित्रिबाई, ज्योतिबा फुले यांना अपेक्षीत असलेला स्त्रीपुरक समाज घडेल असं मत व्यक्त केलं. तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ मा.स्वागत तोडकर यांनी खास आपल्या वेगळया शैलीतील भाषणाने सभागृहात धमाल उडवून दिली. स्त्रीयांच्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या उदाहरणातून स्त्रीया करीत असलेले कष्ट, मेहनत यांचा त्यांनी खास उल्लेख केला. महाविद्यायलीन जीवनात स्टेजवर स्त्री पात्र रंगविण्याचा अनुभव घेताना उडालेली तारांबळ त्या्ंनी फार विनोदी शैलीत सांगितली, लहानपणापासून स्वत:चं अन्न स्वत:बनवून खाताना स्त्रीयांचे कष्ट काय असतात ते स्वत: अनुभविल्याचही ते यावेळी म्हणाले. स्वागत तोडकर यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना एक वेगळी ऊर्जा मिळाली. परिणीता सोशल फाऊंडेशन दरवर्षी एका नामवंत महिलेला परिणीता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर या पुरस्काराने सन्मानीत करते यावर्षी या पुरस्कारासाठी तोडकर संजीवनी प्रा.लि.च्या सीईओ तसेच महिला स्वास्थ्य फाऊंडेशनच्या संस्थापिका संजीवनी तोडकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, अभिनेते किरण माने यांच्या हस्ते तसेच इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार संजीवनी तोडकर यांना प्रदान करण्यात आला. आपल्या पुरस्काराला उत्तर देताना संजीवनी तोडकर भारावून गेल्या होत्या. आपला हा पुरस्कार त्यांनी त्यांचे गुरु, मार्गदर्शक आणि पती स्वागत तोडकर यांना डेडिकेट केला. तोडकरांमुळेच आपण आज आपलं अस्तित्व निर्माण करु शकलो. महिलांसाठी काम करण्याची इच्छा असल्यानेच मी महिला स्वास्थ्य फाऊंडेशनची निर्मिती केली असून या माध्यमातून राज्यातील दहा हजारहून अधिक महिलांसाठी मी काम करीत असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. महिलांच्या अनेक समस्यांवर आम्ही काम करीत असून, कोणत्याही समस्या, प्रश्न, अडचणी घेऊन तुम्ही आम्हाला भेटू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासनही यावेळी संजीवनी तोडकर यांनी दिलं. तसेच परिणीता सखी सन्मान हा मानाचा पुरस्कार यावर्षी मराठी मालिकांच्या लेखिका मा.अश्विनी स्नेहल रमेश, पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. माधुरी गोसावी संस्कृती द वे ऑफ सेलिब्रेशन या इव्हेंट कंपनीच्या सर्वेसर्वा मा.मेघना संजय कदम, मोरया कॅटरिंगच्या सर्वेसर्वा आणि लायन्स क्लब पनवेलच्या लायनलेडी सुरभी सुयोग पेंडसे, प्रसिद्ध अॅस्ट्रो, न्युमरो आणि वास्तू कन्सलटंट मा.आयेशा देशमुख, सुपसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट डॉ. प्रिती गाडे, शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध प्राध्यापिका योगिनी यल्लपा वैदू, केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीजच्या सर्वेसर्वा मा. वैशाली कंकाळ, नवी  मुंबईतील प्रसिद्ध अॅड. सुलक्षणा जगदाळे, कर्जत येथील सुप्रसिद्ध शिक्षिका मा. शारदा निवाथे, नॅचरोपॅथीतज्ज्ञ डॉ.नीता निकम आणि मेडिकल अॅस्ट्रोलॉजर मा. कांचन साळगांवकर, गोकुळ कॉपर हाऊसच्या सर्वेसर्वा मा.सुनिता कोलकर, अनुप एंटरप्रायझेसच्या सर्वेसर्वा मा.प्रतिमा येरगोळे, डेलिश टेस्टि फुडच्या सर्वेसर्वा मा.अपर्णा जंगम, पेणच्या नगरसेविका मा.ज्योती म्हात्रे आणि खारघर येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.सोनाली कालगुडे यांना प्रदान करण्यात आला. यावर्षीच्या महिलादिनासाठी परिणीता सोशल फाऊंडेशनच्या सन्माननीय सदस्या आणि विविध उद्योजिकांनी गिफ्टिंग पार्टनर म्हणून कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिले. यात अलंक्रिता फॅशनच्या सर्वेसर्वा मा.कृपाली चौबळ, इंडियन फ्युजनच्या सर्वेसर्वा मा.दिपाली नारकर, आठल्ये मसालाच्या सर्वेसर्वा मा.श्रुती आठल्ये, श्लोक इव्हेंट्स अॅन्ड डेकोरेटर्सच्या सर्वेसर्वा मा.सोनल पवार यांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमासाठी तोडकर संजीवनी प्रा.लि आणि टीआयपीएल पनवेलचे मुख्य सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला पनवेलमधील सुप्रसिद्ध सुनंदा कोठारी मॅडम, वृषाली सावळेकर, सई पानवलकर, डॉ.राजश्री बागडे, ज्योती शिंदे आणि पत्रकार रुपाली शिंदे यांनी खास उपस्थिती लावली होती.

 या कार्यक्रमात पनवेल येथील कलाकार श्वेता आचरे, पूजा सिंग आणि श्रुतिका तायडे यांनी बहारदार नृत्य सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्ल सर्व मान्यवर आणि परिणीता मैत्रिणींचे, परिणीता एक्झिबिशन विभागाच्या प्रमुख नंदिनी पंडित यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, परिणीताच्या रायगड जिल्हा प्रमुख स्मिता जोशी, गोखले हॉलचे सर्वेसर्वा सुयोग पेंडसे, परिणीता एक्झिबिशन विभागाच्या महाराष्ट्र प्रमुख नंदिनी पंडित, वेदांग सागवेकर यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे परिणीता सोशल फाऊंडेशनचे संस्थापक साक्षी आणि प्रशांत सागवेकर यांनी आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने