पनवेल दि.२९ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे मार्गावर मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज चोरीचे गुन्हे घडत आहे. पनवेल रेल्वे मार्गावर अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन मोबाईलसह पाकीट चोरून नेल्याची घटना घडली आहे.
कामोठे येथील अभिजीत कोरगावकर गोरेगाव वरून पनवेलला येत असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल व पाकीट चोरून नेले. तर दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथील तनुला गाढवे सानपाडा येथील कार्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत असताना महिलांच्या डब्यात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील मोबाईल पळवून नेला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Tags
पनवेल