पनवेल दि.२९ (वार्ताहर) : आपल्याच मावसबहिणीच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार पनवेल तालुक्यातील जावळे गावात घडला आहे. पीडित मुलीच्या आईने तिला उपचाराकरीता हॉस्पीटल येथे नेल्यावर पिडीत मुलगी ही गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत आपल्या मावसभावा विरोधात तक्रार दाखल केली आहे.
आरोपी बिरेंद्र लखन गंझू (वय २७, रा.झारखंड) याने पीडित मुलीबरोबर ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुद्धा तिच्यासोबत बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे पीडित मुलगी हि गरोदर राहिली. दरम्यान पीडित मुलीची तब्येत खराब झाल्याने तिच्या आईने तिला उपचाराकरीता हॉस्पीटल येथे नेल्यावर पिडीत मुलगी ही गरोदर असल्याचे समजले. त्यांनतर पीडितेच्या आईने तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपी बिरेंद्र लखन गंझू विरोधात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांनी घटनेचे गंभीर ओळखून तात्काळ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे व पोलीस शिपाई प्रसाद घरत यांना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासद्वारे सदर आरोपी हा मुंबई येथील गोरेगाव या ठिकाणी नोकरीवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर जागेचा शोध पोलिसांनी त्याला नोकरीच्या ठिकाणावरून अटक केली आहे व त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल