पनवेल दि.२९ (संजय कदम) : पनवेल शहरातील दुर्गा माता मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र महिन्यातील अष्टमी निमित्त होम हवनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यानिमित्ताने आज सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अष्टमी महा-हवन भक्तगणांच्या साथीने संपन्न झाला. तसेच यावेळी पूजा, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्याचप्रमाणे उपस्थित भक्तांसाठी आयोजित महाप्रसादाचे लाभ भक्तगणांनी घेतला.
Tags
पनवेल