कणकवली मधील ‘माती नेचर रिसॉर्ट’ येथे उभारण्यात आली भारतातील सर्वात उंच गुढी


पनवेल दि. २३ (संजय कदम) : कणकवली येथील माती नेचर रिसॉर्टमध्ये भारतातील नैसर्गिक स्वरूपातील सर्वात उंच गुढी उभारण्यात आली आहे. भारतातील सर्वात उंच गुढी फडकावत माती नेचर रिसॉर्ट या गुढीपाडव्याला आनंद आणि समृद्धीचा संदेश जगाला दिला आहे.                40 फूट लांबीचा बांबू वापरून आणि पारंपारिक कापडात गुंडाळलेली ही गुढी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदी पद्दतीने व्हावी यासाठी माती नेचर रिसॉर्टने हा पुढाकार घेतला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने माती नेचर रिसॉर्ट्सच्या पाहुण्यांना आणि मोठ्या संख्येने लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, माती नेचर रिसॉर्टच्या संस्थापिका साक्षी सावंत म्हणाल्या कि, "माती नेचर रिसॉर्टला सर्व पाहुण्यांचा आशीर्वाद आहे. सर्वात उंच गुढी बसवल्यामुळे, आम्ही आमच्या सर्व पाहुण्यांच्या आणि भारतातील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू इच्छितो. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, आम्ही त्यांना नेहमी भव्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, माती नेचर रिसॉर्टमधील ही सर्वात उंच गुढी मालमत्ता आणि आनंदाचे प्रतीक बनेल असा विश्वास साक्षी सावंत यांनी व्यक्त केला.  
थोडे नवीन जरा जुने