श्री स्वामी समर्थ प्रगट दीन सोहळा पनवेलसह आपटे फाटा येथे संपन्न






पनवेल दि. २३ (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे यंदाही पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) तसेच आपटे फाटा येथील मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दीन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला. 


           श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त शहरातील गावदेवी पाडा येथील श्री. स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे श्री स्वामी समर्थ महाराज ची काकड आरती, नित्य नैमत्तिक पूजा, लघु रूद्र, गुरू पाद्यपूजन आणि आरती, स्वामी प्रगट दीन आध्यय वाचन, श्री दत्त गायत्री होम, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ चे भजन, श्री गुरुवर्य मठाधिपती श्री सुधाकर भाऊ यांचे प्रवचन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन आगरी समाज हॉल येथे करण्यात आले होते





. यावेळी सुप्रसिद्ध ,मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी श्री. स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे स्वामींचे दर्शन घेतले. आजच्या प्रकट दिनानिमित्त मोठ्या संख्येने स्वामी सेवक सहभागी झाल्याची माहिती कु. अवधूत सुधाकर घरत यांनी दिली. तसेच आपटे फाटा येथील मठात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद घेतले.  


थोडे नवीन जरा जुने