घरफोडीत २ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास


पनवेल दि.०६ (संजय कदम) : बंद घराचे कुलूप तोडून घरातील चांदीच्या दागिन्यासह २ लाख ७५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. 


   तितील सहानी यांच्या करंजाडे सेक्टर ४ येथील राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन घरात लाकडी कपाटामध्ये ठेवलेली २ लाख ७० हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचा चांदीचा पैंजन चोरून नेले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने