ट्रेलरचालकाच्या अर्जेंट ब्रेकने दुचाकीचालक जखमी
पनवेल दि.०६ (संजय कदम) : ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठून आलेल्या दुचाकीस्वार जावून धडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


पेंढारे येथील संतोष म्हात्रे हे पनवेल-मुंब्रा हायवे वरून पनवेलच्या दिशने जात असताना ऋतिका हॉटेलच्या समोर एका अनोळखी ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने संतोष हा जावून त्या ट्रेलरला धडकला व यात तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात संतोष यांच्या डोळे, कपाळ व जबड्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने