ओव्हरहेड वायरचा शॉक लागून इसमाचा मृत्यू





ओव्हरहेड वायरचा शॉक लागून इसमाचा मृत्यू
पनवेल दि.३१ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशनवर आलेल्या मेल गाडीचे टपावर चढून ओव्हरहेड वायरचा शाक लागून गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पनवेल रेल्वे पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 



                राजन चद्रका प्रसाद असे या मयत इसमाचे नाव असून पनवेल रेल्वे स्टेशनवर आलेल्या मेल गाडीचे टपावर चढून ओव्हरहेड वायरचा शाक लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सदर इसमाचे वय अंदाजे 30 वर्षे, उंची ५ फूट ३ इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळासावळा सावळा चेहरा उभट नाक सरळ, दात- शाबुत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस दूरध्वनी क्र. ०२२-२७४६७१२२ किंवा पोलीस उपनिरीक्षक बी एस जाधव (मो.९४९४९१२२९४) यांच्याशी संपर्क साधावा.



थोडे नवीन जरा जुने