अवकाळी पावसामुळे वीट व्यवसाय चिंताग्रस्त कच्चा विट वाचविण्यासाठी धडपड


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ८ मार्च, वातावरण बदलाचा फटाका विट व्यवसाय पासून ते पाळेभाज्या लागवड करीत असलेल्या शेतकरी यांना सुद्धा बसला सायंकाळी ७ वाजता तुरळक अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे आपल्या कच्चा विट वाचविण्यासाठी विट व्यवसायिकांची तारांबळ उडाली पहावयास मिळाली.आपल्या विटाचे नुकसान होवू नये यासाठी कर्मचारी यांच्या मदतीने प्लॅस्टिक टाकण्यात आले.                सोसाट्यांचा वारा समवेत तुरळक पाऊस पडत असल्यामुळे हा तिव्र स्वरुपाचा झाला खूप नुकसांनीला सामोरे जावे लागले असते.मात्र तसे न होता तुरळक पाऊस पडल्यामुळे विट व्यवसायिकांचे सौम्य नुकसान झाले.अवकाळी पावसाने सुरूवात केल्याने सर्वत्र गारावा निर्माण झाला असला तरी वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचवण्याकरीता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले, वीट व्यवसायिकांचे नुकसान झाल्याने वीट भट्टी व्यवसाय संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे. 


               तर अजूनही पाऊस बरसेल काय यांची शास्वती नाही.यामुळे वीटभट्टी मालकांचे अधिक मोठे नुकसान होणार या भीतीपोटी कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची धावपळ उडत आहे.अवकाळी पावासाने सर्वत्र ठिकाणी दाणादाण उडवून दिली एकांदरीत अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाल्यामुळे व्यवसायीक चिंताग्रस्त झाले आहे.

थोडे नवीन जरा जुने