विमला तलाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे ) 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॉर्निंग कट्टा आणि उरण सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील विमला तलाव गार्डन मध्ये 8 मार्च 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला भगिनींचा गुलाबपुष्प, केक देऊन सन्मान करण्यात आला. उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, अँड वर्षा पाठारे, गौरी मंत्री, पुनम चौहान यानी आपली मनोगत व्यक्त करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे यावेळी पुरुषांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती. महिला दिना निमित्त मॉर्निंग कट्टाचे सुबोध दर्णे,प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांना शुभेच्छा दिल्या. 


साहेबराव ओहोळ यांनी 'आई' गीत गाउन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित सर्वांचे प्रकाश दांडेकर यांनी आभार मानले. यावेळी मॉर्निंग कट्टाचे सुबोध दर्णे,सूर्यकांत दांडेकर, हरमन फर्नांडिस,मुजमील मुकरी, बाबूशेठ, उल्हास मोकाशी, सूनिल घरत, दिलीप महाडिक, अनंत पाटील,सुरेश घरत तर उरण सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेचे कल्याणी दुखंडे,दिपाली शिंदे, प्रियांका पाटील, प्रतिक्षा पेडणेकर,अर्चना म्हात्रे, दीपाली मुकादम, स्मिता पाटील, श्रीमती नलिनी चिटणीस, संध्यारांणी ओहोळ,अफशा मुकरी, गीता पौडवाल,गीता पवार, मानसी म्हात्रे, मोहिनी धुमाळ, तृप्ती रवींद्रन आदी महिला मान्यवर उपस्थित होते. एकंदरीत विमला तलाव येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने