पनवेल / प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरासह, जिल्हाभर विविध उपक्रम उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने जागतिक दिनानिमित्त ग्रामपंचायत कसलळखंड
शिवाजीनगर फणसवाडी येथील आदिवासी वस्तीतील महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी पंचायत सभापती वसंत काठवले, सरपंच तानाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महादेव पाटील,
प्रसिद्धीप्रमुख शीतल पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष निलेश घाग, नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी, सदस्य विद्याधर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी रवींद्र वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले.
Tags
पनवेल