पनवेल(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेन यांच्यावतीने पनवेल जवळील खांदा कॉलनी येथील रोटरी मेगा मेडिकल सेंटरमध्ये विविध आरोग्यसेवांचा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
शनिवार दिनांक 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता सेक्टर 1 खांदा कॉलनीमधील रोटरी मेगा मेडिकल सेंटरमध्ये कमी खर्चात अंशा डायलेसिस सेंटर, डायग्नोस्टिक सेंटर आणि दातांचा दवाखाना या वैद्यकीय सेवा जनतेसाठी सुरू करण्यात येणार आहेत. या सेवांचा शुभारंभ पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. अधिक माहितीसाठी 8695108108 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे.
Tags
पनवेल