पोलीसांनी परवानगी नाकारल्याने बंधाऱ्यातील आंदोलन स्थगीत





शहापूर घेरंड गावांतील एमआयडीसीच्या मालकीचा फुटलेला संरक्षक बंधारा एमआयडीसी वर्ष झाले तरी बांधत नाही. परिणामी दर अमावास्या पौर्णमिला गावांत उधाणाचे पाणी शिरुन नुकासान होत आहे. याच्या निषेधार्थ या फूटलेल्या बंधाऱ्यातच उभे राहून आंदोलन करण्याचा निर्णय शेतकन्यांनी घेतला होता. मात्र त्यास रायगड पोलीसांनी परवानगी नाकारल्याने हे आंदोलन स्थगित करावे



 लागल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी दिली. दरम्यान शहापूर घेरंड एमआयडीसी संरक्षक बंधारे बांधण्यासाठी निसर्गाकडून कमी कालावधी असल्याने लवकरात लवकर काम सुरु करण्यासाठी संबंधित ठेकेदारास निर्देश देण्यात यावे याकरिता एमआयडीसी अलिबागचे कार्यकारी अभियंता एस. एस. ननावरे यांना निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे एमआयडीसीचे स. उप मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आल्याचे नंदकुमार पाटील यांनी सांगीतले. शहापूर घेरंड ता. अलिबाग येथील सरक्षक बंधारे बांधण्यासाठी एमआयडीसीने ठेकेदाराची नेमणूक केलेली आहे. आमावस्या व पौर्णिमा या मधील केवळ १५ दिवसच काम करता येते व त्यातील कामगाराच्या सुट्टया लक्षात घेता ३० दिवसातील १२ दिवस काम करण्यास मिळतात त्याचे नियोजन करावे असे म्हटले आहे.



थोडे नवीन जरा जुने