पनवेल दि.०४ (संजय कदम) : पनवेलसह नवी मुंबईमध्ये युवा सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अनेक कॉलेजवर युनिट स्थापनेचा आमचा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने झाला आहे. आणि त्यामुळे आजचे विद्यार्थी व तरुण पिढी हि आजही ठामपणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या पाठीमागे उभा आहे असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज पनवेल विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्यावेगवेगळ्या ठिकाणच्या नामफलकांच्या उदघाटनाप्रसंगी व्यक्त केले.
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेत्रृत्वाखाली आज पनवेल विधानसभा मधील विविध कॅालेजमध्ये युवासेनेचे युनिट सुरु करण्यात आले. यामध्ये खारघर सरस्वती इंजिनिअरींग कॉलेज, कामोठे एम जी एम मेडीकल कॅालेज, शांतीनिकेतन कॅालेज नवीन पनवेल येथे युनिट सुरु करण्यात आले आहे. या युनिटच्या नामफलकांचे अनावरण युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, पनवेल संपर्क प्रमुख योगेश तांडेल,
उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहीते, उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, कामोठे शहर महेश भिसे, सागर पाटील, नवीन पनवेल सुशांत सावंत, ग्रामीण विभाग अधिकारी जीवन पाटील यांच्यासह युवासैनिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले कि, मनसेचे संदीप देशपांडे वरील हल्ला हा कसब्यामध्ये भाजपला जी हार पत्करावी लागली त्यामुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे भरकटवण्यासाठी मनसेने केलेला हा स्टंट आहे. त्यामुळे या बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करणे पसंत केले आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
Tags
पनवेल