निधी उपलब्ध न झाल्यास उपोषणाचा निर्धार

पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाडयांना 
वारंवार पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही तो मिळावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना दिले आहे.जिर्णे हद्दीमध्ये ताङमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या महसूली आदिवासीवाड्या आहेत. ये-जा करण्यासाठी रस्त्याची उपलब्धता नाही. गेली दोन वर्ष या आदिवासीवाड्या साकव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अर्ज व विनवण्या करत आहेत. परंतु, त्यांच्या रस्त्याच्या मागणी कडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही साकव प्रकल्प पेण यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना ताड़माळ या कातकरीवाडीला रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावी म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर जिर्णे ग्रामपंचायतीने डिसेंबर 2022 तसेच ताडमाळ, कातकरीवाडीच्या ग्रामस्थांनी फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज दिला, परंतु, गेली दोन वर्ष ताडमाळ ग्रामस्थ निधी मिळावी म्हणून पाठपुरावा करत आहेत.
 तसेच जिर्णे ग्रामपंचायतीकडून देखील जिर्णे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ताडमाळ आणि तुरमाळच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावी म्हणून पत्रव्यवहार होत आहे. मात्र अर्जविनवण्या करून देखील निधी उपलब्ध होत नसल्याने संतोष वाघमारे आणि साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेणच्या कार्यालयाला आदिवासी बांधव भगिनिंच्या शिष्ट मंडळाने भेट देउन निवेदन दिले. यामध्ये जर युध्द पातळीवर ताडमाळ आणि तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाली नाही तर, 5 एप्रिल 2023 रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना दिला आहे. 


प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेत ताडमाळ आणि तुरमाळ या दोन्ही आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी ठक्कर बाप्पा या योजनेतून निधीची उपलब्धता करून देतो असे सांगितले. तसेच तारखे नंतर सदरील रस्त्याची पाहणी करण्यासाठी कार्यालयीन निरीक्षकांना 1 पाठवितो तसेच या वाडयांची किती लोकसंख्या आहे त्यानुसार निधीची उपलब्धता करून देतो असे सांगितले. संतोष वाघमारे यांनी 5 तारखेच्या अगोदर जर निरिक्षक पाहणी करण्यासाठी आले नाही तर 5 एप्रिल 2023 रोजी आम्ही उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेणार नाहीत. यावेळी दोन्ही ही आदिवासी वाडया मिळून मोठया संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने