घर विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा प्रकार कोर्लई येथे घडला आहे. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे याबाबत दाखल करण्यात आलेल्या
तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी एकावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. कोर्लई ख्रिश्चनपाडा येथील मिलर रुबान रुझारिओ यांनी इस्टेट एजंट व्यावसायीक रॉकी तोमास येशीयस याच्या माध्यमातून सावत्र भाऊ टोनी रुबान रुझारिओ व राजेंद्र रुबान रुझारिओ यांचे मालकीचे कोर्लई प्रा. पं. हद्दीतील घर मिळकत क्रमांक 679/1/2 व घर मिळकत क्रमांक 619/1/3 या घर मिळवून देतो, असे सांगून रॉकीने रुझारिया यांच्याकडून विविध वेळा 25 लाखांच्या आसपास पैसे धनादेशाद्वारे घेतले, पैसे दिल्यानंतर घर मिळकतीचा व्यवहार पुर्ण करण्याचा तगादा लावला असता इस्टेट एजंट व्यावसायीक रॉकी तोमास प्रेशीयस टाळाटाळ करून लागला. यावेळी रॉकीने हा व्यवहार आता 23 लाख रूपयांत होणार नसून 30 लाख रूपयांत होणार आहे. मात्र व्यवहार 30 लाख रुपये व्यवहार परिस्थिीतीनुसार पूर्ण करू शकत नसल्याने सदर माझी रक्कम मला परत कर, असे वेळोवेळी भेटून सांगितले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiM5BHNVaJKCTGTDClA-5KRGNfWA-HHahsKBN88jnPXfxjCohLC0f_KurTpR_hcOIZxAZgtX_Cvqmmj4MPDckWxy5mmJeE7e1rnUcakxlVs8g2ytM_0aQv-J7u9ANQhl9PsPoEYCNRwMnh/s1600/1661839931568.png)
Tags
मुंबई