राजा प्रसेंजित शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘लोकशाही, बेटी बचाओ बेटी पढाओ, भारत एकतेचा’ संदेश
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : परिवर्तन सामाजिक संस्था संचलित रोहिंजन येथील राजा प्रसेंजित पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात प्रज्ञायन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल तालुक्यातील रोहिंजन येथील मैदानात संपन्न झालेल्या प्रज्ञायन महोत्सवात विध्यार्थ्यांनी लोकशाही, भारत एकता, बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी विविध विषयांवरील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत सामाजिक एकात्मितेचा संदेश दिला. प्रज्ञायन महोत्सवाचे उदघाट्न केराबाई शेषराव करडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सिनेअभिनेते संजय खापरे, सिनेअभिनेत्री शिवकांता सुतार, प्राचार्य डॉ. जी के डोंगरगावकर, प्राचार्य राहुल डोंगरगावकर, प्रा. पी. एल. कांबळे, राजू अमृतवार, ऍड. रविकुमार करडे, ऍड. विठ्ठल गडीकर, ऍड. विजयकुमार कांबळे, ऍड. रुपस कलकत्ते, गंगाधर गायकवाड, संविधा करडे, स्नेहा गवळी, निकिता भालेराव, दिलीप कांबळे, विलास करडे, संजय करडे, सुरेश करडे, प्रा. रमेश करडे, महेश साळुंके, संग्राम पाटील, हर्षवर्धन गोमा पाटील, नारायण करडे, भानुदास कांबळे, गौतम कांबळे, अक्षय कांबळे, प्रकाश फुलसरे, प्राचार्या स्नेहल हिवंज, उपप्राचार्या पूजा कांबळे, बालाजी वाघमारे, शंकर वाघमारे, चंद्रकांत कांबळे, राम गुडमे, आत्माराम भेंडेगावकर, किरण पाटील, अर्जुन वाघमारे, प्रमिला करडे, अनिता करडे, विवेक करडे, क्रांती करडे, साक्षी करडे, बालाजी इंगळे, प्रताप पाटील, लतीफ शेख व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते


. संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रज्ञायन पुरस्कार सुशील महाडीक यांना देण्यात आला. शिक्षणातून सामाजिक परिवर्तन हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.प्रज्ञायन महोत्सवाच्या माध्यतून शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करीत असल्याचे संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. रमेश करडे यांनी सांगितले.थोडे नवीन जरा जुने