वीर वुमन्स फाऊडेशनच्या वतीने वडाळे तलाव येथे स्वच्छतेसाठी देण्यात आले 10 डस्टबीनपनवेल दि.०६ (वार्ताहर) : सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सक्रीय असलेल्या वीर वुमन्स फाऊडेशनच्यावतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव येथे 10 डस्टवबीन देण्यात आले आहेत. हे डस्टबीनचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांच्याहस्ते महपिालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आले.


वीर वुमन्स फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यामतून सामाजिक कार्य करत आहेत. त्याअंतर्गत फाऊंडेशनच्या सदस्यांना पनवेल शहरातील सौंदर्याचे केंद्र बिंदू असलेल्या वडाळे तलाव परीसरात कचरा टकण्यासाठी डस्टबीन उपलब्ध नसल्याचे निर्दशनास आले. त्यापार्श्वभुमीवर वीर वुमन्स फाऊडेशनच्यावतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलावा परीसराकरीता 120 लीटरचे 10 डस्टबीन उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यांचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परेश ठाकूर यांच्याहस्ते महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


 यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सृष्टी निसार, सेक्रेटरी सीमा जैन, खजिनदार अर्चना सोनी, पूनम जैन, नम्रता .एम. बांठिया, नम्रता एस बांठिया, सिंपल जैन, कीर्ती मुनोत, अल्का मेहता, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वछता निरीक्षक महेंद्र भोईर, स्वछता निरीक्षक जयेश कांबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वीर वूमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांनी, वडाळे तलाव परीसर हा सर्वात स्वच्छा आणि सुंदर ठिकाणी म्हणून ओळखले जावे या करीता आणि स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यात करीता हा उपक्रम राबवला असल्याचे मत व्यक्त केले.थोडे नवीन जरा जुने