होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी उपक्रम


 महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी वाटप
पनवेल / प्रतिनिधी
    होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांना सुचली 
न त्यानुसार गेल्या 6 वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम विविध संस्थेतर्फे केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना पुरणपोळीचे वाटप केले गेले. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे पुरणपोळीचे वाटप करण्यात आले. 


या पुरणपोळी वाटप कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी जाणीव फाउंडेशन संस्था, उमेश इनामदार व काही मान्यवरांनी पुरणपोळी देऊन विशेष सहकार्य केले.


  


 या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सहसचिव शैलेश चव्हाण, खजिनदार सोनल नलावडे, प्रसिद्धीप्रमुख शितल पाटील, सदस्य प्रगती दांडेकर, विद्यासागर ठाकूर,मनोहर पाटील, शशिकांत दळवी, रहीस शेख, युनूस शेख यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने