जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे करण्यात येणार साड्या वाटप.


पनवेल / प्रतिनिधी
   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने बुधवार दिनांक 08 मार्च रोजी संध्याकाळी ठीक 4.00 वाजता आदिवासी वस्तीतील महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहे. 


        पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर कसळखंड येथील फणसवाडी या आदिवासी वस्तीतील महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त साड्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी दिली.
  या उपक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव संतोष सुतार यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने