भेंडखळ गावच्या दमयंती रतन ठाकूर (हिरकणी)यांचा महिला दिनानिमित्त जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केला सत्कार.





उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )
 रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील पोलारिस कंपनीच्या विरोधात भेंडखळ गावातील ग्रामस्थांनी व कामगारांनी हजारोंच्या संख्येने येऊन एल्गार केला व १९८४ च्या आंदोलनाची जणू काही पुनरावृत्ती होते की काय असा बाका प्रसंग उभा राहिला होता. भेंडखळ गावातील ५०२ बेरोजगार कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी भेंडखळ ग्रामस्थांनी २७ फेब्रुवारी २०२३ पासून पोलारिस कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केले होते परंतु व्यवस्थापनाने त्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष न देण्यामुळे ३ मार्च पासून आंदोलकांनी गेट बंद आंदोलन पुकारले त्यामुळे भेंडखळ गावला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते


. गावातील प्रत्येक नागरिकांस पोलिसांकडून १४९ च्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. एस आर पी च्या तुकड्या सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. परंतु पोलिसांच्या कुठल्याही भीतीला ग्रामस्थ व कामगार न घाबरता गावातील महिलांनी व कामगारांनी कंपनीच्या गेटला धडक देऊन गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला आंदोलकांच्या आक्रमकपणामुळे पोलीस प्रशासनाची अक्षरशः भांबेरी उडाली. पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली याचवेळी भेंडखळ गावातील दमयंती रतन ठाकूर (हिरकणी)या महिलेने आपल्या जीवाची परवा न करता पोलिसांचा चक्रव्युह भेदून १५ फुटाच्या गेटच्यावरून उडी मारून कंपनीत घुसली.



 यावेळी पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली शेवटी स्थानिक नेते मंडळी यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कामगार नेते भूषण पाटील,अतुल भगत,प्रशांत पाटील, एल बी पाटील , विकास नाईक.आदी नेतेमंडळींनी सदर परिस्थिती एकदम नेटाने हातल्यामुळे दिनांक ५ मार्चला कंपनी प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शवली त्याप्रमाणे त्या चर्चेअंती तोडगा निघून भेंडखळ गावाच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय मिळाला.५०२ कामगारांची गेली ११ महिने बंद असलेली चूल पेटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. "हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, ते वाया जाऊ देयाचे हि नसते" प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत लोकनेते. दि. बा पाटील साहेबांचे हे वाक्य आज भेंडखळ गावाच्या महिलांनी व युवकांनी सार्थ केले आहे


. या लढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावून लढलेल्या आपल्या भेंडखळ गावाची एक महिला भगिनीं दमयंती रतन ठाकूर "हिरकणी " हिचा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राची शान व परंपरा असलेली पैठणी साडी देऊन सत्कार केला. यावेळी त्यांची लेक कुमारी विश्रुती रतन ठाकूर हिला एमबीए च्या शिक्षणासाठीही मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी उरण तालुका युवक इंटक चे अध्यक्ष राजेंद्र भगत,भेंडखळ गावातील युवक लंकेश ठाकूर, अजित ठाकूर,सचिन भोईर,अनिल ठाकूर, नरेंद्र ठाकूर, जयंत ठाकूर, पारस ठाकूर, व ग्रामस्थ उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने