भावना किआ सर्व्हिस सेंटरमुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळणार


पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे भावना किआ मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सर्व्हिस सेंटर सुरु केले आहे. या सर्व्हिस सेंटरचे उदघाटन भावना ग्रुपचे राजेश शहा, भावना ग्रुपच्या चेअरमन अपर्णा शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश शहा यांनी सांगितले कि, या सर्व्हिस सेंटरमुळे पनवेलसह रायगड परिसरातील ग्राहकांना आता नवी मुंबई किंवा मुंबईत जाण्याची गरज नसून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त सर्व्हिस सेंटर सुरु झाले असून याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केली. 


 यावेळी पुढे बोलताना राजेश शहा यांनी सांगितले कि, या ठिकाणी सर्व प्रकारची गाड्यांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. किआ मोटर्स हि नेहमीच नवनवीन प्रणाली बाजारात घेऊन येत आहे. त्यामुळे ग्राहकांची पहिल्या पसंतीची गाडीसाठी किआ मोटर्सकडे पाहिले जाते. ग्राहकांना नवनवीन सुविधा देण्याकडे आमचा कल असतो त्यामुळे ग्राहकांची किआ मोटर्सची गाडी खरेदीकडे ओढ़ असल्याचे त्यांनी सांगितले तर भावना ग्रुपच्या चेअरमन अपर्णा शहा यांनी सुद्धा या सर्व्हिस सेंटर बद्दल माहिती देताना सांगितले की, वाहन खरेदी करण्याकरिता ग्राहक सध्या चोखंदळ झाला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा नवनवीन यंत्रप्रणाली या सर्व्हिस सेंटरमध्ये उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे येथे सर्व्हिस सेंटर उभारल्याने स्थानिक तरुणांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा स्थानिक तरुणांना प्राधान्य देणार आहोत असे सांगितले. यावेळी कंपनीचे अधिकारी श्री डेविड, राघवेंद्र राव, श्री सुमनप्रीत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
थोडे नवीन जरा जुने