महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे कळंबोली व कामोठे पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट


पनवेल / प्रतिनिधी
नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील अनेक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. नुकतेच कामोठे आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर आता त्याजागी कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अजय कांबळे 


तर कळंबोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दिलीप गुजर यांची नियुक्ती झाली. याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष सुनील पाटील, प्रसिद्धीप्रमुख शितल पाटील, सदस्य मनोहर पाटील, मछिंद्र पाटील, राजपाल शेगोकार आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने