पनवेल महापालिका हद्दीतील महापालिकेसमोरील देवाळे तलाव येथे तलावात बुडणाऱ्या 2 मुलांचे जीव वाचवणारे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक दिपक कदम यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे प्रिंट पॉईंट कार्यालय येथे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे सल्लागार दिपक महाडिक, अध्यक्ष केवल महाडिक, नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी, खालापूर तालुकाध्यक्ष निलेश घाग, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल