शिवसेना शाखा जसखार आयोजित धर्मवीर चषक २०२३ उत्साहात संपन्न.


उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )शिवसेना शाखा जसखार यांच्या वतीने प्रकाश झोतातील भव्य ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान,जसखार,ता. उरण,जि. रायगड येथे आयोजित करण्यात आले होते


. या स्पर्धेला रसिक प्रेषक, नागरिक, ग्रामस्थांचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.शिवसेना शाखा जसखार आयोजित धर्मवीर चषक २०२३ चे उदघाटन रुपेश पाटील शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा संपर्क प्रमुख रायगड, परेश पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना, अतुल भगत उपजिल्हा प्रमुख, सुरेश म्हात्रे कामगार नेते यांच्या हस्ते झाला.


यावेळी प्रणाली म्हात्रे उपसरपंच,हेमलता ठाकुर सदस्य,वैजयंती ठाकुर,धनवंती ठाकुर,दमयंती म्हात्रे,सीमा ठाकुर या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य,गणेश घरत विभाग प्रमुख,नितीन पाटील माजी सरपंच, निल पांडे युवा सेना कार्यकारिणी सदस्य, रवि पाटील विश्वस्त जे.एन.पी.टी, हितेंद्र ठाकुर अध्यक्ष 4141 संस्था, हेमंत भोईर उपतालुका प्रमुख,रमाकांत पाटील नगरसेवक ठाणे.


प्रमुख आयोजक अमित ठाकुर शाखा प्रमुख जसखार,हर्षल ठाकुर अध्यक्ष युवा सामाजिक संस्था,सुरेंद्र ठाकुर,सूर्यकांत ठाकुर, मनीष म्हात्रे,रणजित पाटील उपस्थित होते. या स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला होता.प्रथम क्रमांक मंगल मूर्ती दारावे क्रिकेट संघ,दुसरा श्री दत्त भातान क्रिकेट संघ तिसरा रायगड एक्स्प्रेस सुधीर तांडेल व धीरज म्हात्रे क्रिकेट संघ जसखार यांनी पटकविला

.

थोडे नवीन जरा जुने