काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याने काँग्रेस तर्फे उरण मध्ये निदर्शने.
निदर्शनातून मोदी सरकार व केंद्र शासनाचा केला निषेध.उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याने देशात सर्वत्र काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी व तीव्र संताप पसरली आहे.सर्वत्र निषेध, निदर्शने, आंदोलने करून या गोष्टीचा जाहीर निषेध काँग्रेसने केला आहे.लोकसभा सचिवालयने त्यांची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून या अन्याय कारक निर्णया विरोधात व राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली
.या निदर्शनातून मोदी सरकार तसेच केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मोदी सरकार, केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला आहे.यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकार वर जोरदार प्रहार केला.मोदी सरकार हे हुकूमशाही असल्याचे सांगत लोकशाहीला दडपण्याचे काम मोदी सरकार करत आहे. मोदी सरकार मुळे आज लोकशाही धोक्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्व रद्दचा आम्ही जाहीर निषेध करतो असे बोलून त्यांनी भाजपचा, केंद्र शासन व मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही भाजप, केंद्र शासन, मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही मूल्ये धोक्यात आली असून आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेवटपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत.राहुल गांधी यांनी सात्यत्याने भाजप मधील भ्रष्टाचार बाहेर काढला. भाजप नेत्यांची अनेक चुकीच्या गोष्टी बाहेर काढल्या. निरव मोदी, मेहुल चोकशी, अदानी, मल्ल्या असे अनेक उद्योजकांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला आहे. भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई आदी मुद्द्यावर राहुल गांधी सात्यत्याने आवाज उठवित आहेत.आंदोलने करत आहेत. लढा देत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे.असे विनोद म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त करत भाजपचा व केंद्र शासनाचा निषेध केला.

उरण शहरातील काँग्रेस कार्यलया समोर निदर्शने करण्यात आली.या प्रसंगी विनोद म्हात्रे तालुकाध्यक्ष, प्रकाश पाटील -शहराध्यक्ष, महेंद्र ठाकूर -जिल्हा सरचिटणीस,
मिलिंद पाडगावकर -वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष, किरीट पाटील इंटक रायगड जिल्हाध्यक्ष,मार्तंड नाखवा -मच्छिमार नेते,कमलाकर घरत -राष्ट्र सेवा दल रायगड जिल्हा अध्यक्ष,केशव घरत -रायगड जिल्हा सरचिटणीस,संध्या ठाकूर -रायगड जिल्हा उपाध्यक्ष,रेखा घरत -महिला तालुकाध्यक्ष,निर्मला पाटील -उपाध्यक्ष तालुका, भारती कांबळे -तालुका सरचिटणीस,गोपीनाथ मांडेलकर -उरण तालुका काँग्रेस सेवा दल अध्यक्ष,अशोक भगत -तालुका उपाध्यक्ष, वैभव ठाकूर -उरण तालुका सरचिटणीस,अफशा मुकरी -शहर अध्यक्ष, सदानंद पाटील -केगांव गाव अध्यक्ष, अमीना पटेल -शहर सरचिटणीस, दिपक ठाकूर ग्रामपंचायत सदस्य भेंडखळ,योगसाधना पाटील -महालन विभागीय अध्यक्ष, मंगेश म्हात्रे -पूर्व विभाग अध्यक्ष,शंकर ठाकूर -माजी सरपंच धुतुम आदी उरण तालुका व उरण शहरचे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने