ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप.
उरण दि. 25 (विठ्ठल ममताबादे )आपल्या पत्रकारीतेतून अन्यायाला नेहमी वाचा फोडणारे, उरण मधील जेष्ठ पत्रकार तथा उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांच्या वाढदिवसा निमित्त उरण तालुक्यातील उरण कोर्ट जवळ असलेल्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. 


पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळे वाटली. सफरचंद, पेरू, मोसंबी, संत्री, चिकू, केळी, संत्री आदी फळे रुग्णांना वाटण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू, सामाजिक कार्यकर्ते कैलास शिसोदिया, पत्रकार विठ्ठल ममताबादे , इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,डॉ. बाबासो कालेल ,औषध निर्माण अधिकारी संजय अमृतकर, समुपदेशक - महादेव पवार,वैदयकीय अधिकारी - डॉ. अजिंक्य भारती,अधिपरिचारिका श्रीम. कृपा पाटील, निवेदिता कोटकर, सुरक्षा रक्षक - मंथन म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी -ललित पवार, टीबीएचव्ही अंकिता कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने