रोटरी खारघर मिडटाउन तर्फे महिला जागतिक दिवस साजरा






पनवेल दि.१६ (संजय कदम) : रोटरी खारघर मिडटाउन तर्फे महिला जागतिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आले 



या कार्यक्रमामध्ये खारघर पुलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका अश्विन राऊत, खारघर मधील रिक्षा चालक सुमन शिंदे, खारघर पुलिस ठाण्याच्या पोलिस नाईक रजनी घासे, कळंबोली येथील वृद्धाश्रमाचे डायरेक्टर मनमीत कौर, पुलिस कांस्टेबल आशा जवळेकर यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष प्रशांत कालन, सचिव अनामिका श्रीवास्तव, सर्व मागील अध्यक्ष व रोटरीचे सदस्य उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने