तीन लाखाची लाच घेताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग २ चे क्षेत्र अधिकाऱ्याला रंगेहात पकडले




पनवेल दि.१६ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन मध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणार्‍या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठ्वण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर सिडको अधिकाऱ्याला पहिला हप्ता म्हणुन रुपये तीन लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 



तक्रारदार पुरुषाकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग २ चे क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा (५७) यांनी विमानतळ पुनर्वसन मध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणार्‍या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी सिडको कार्यालयात आरोपी मुकुंद बंडा यांना पहिला हप्ता म्हणुन रुपये तीन लाख रुपये स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका ज्योती देशमुख, पोनी बेंद्रे ,पोहवा पवार, पोहवा गायकवाड, पोना ताम्हाणेकर, पोना नाईक, पोशी चौलकर आदींच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.


थोडे नवीन जरा जुने