ग्रामसुधारणा मंडळ बोकडवि-याच्या अध्यक्ष पदी त्रिशूल ठाकूर.
 उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) गुढीपाडव्याच्या दिवशी उरण तालुक्यातील बोकडविरा गावात ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षाची लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. या निवडणूकीत बोकडविरा गावचे रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्त त्रिशुल परशुराम ठाकूर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.सूर्यकांत लहू पाटील यांना पराभूत करून त्रिशूल ठाकूर विजयी झाले आहेत.त्रिशुल ठाकूर यांनी या अगोदर समाजात अनेक विविध लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. नम्र व प्रेमळ वृत्तीचे त्रिशूल ठाकूर यांनी गोरगरिबांना अडीअडचणीत असताना अनेकदा मदतीचा हात दिला आहे. त्रिशूल ठाकूर यांची बोकडविरा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेखर पाटील, मनोज पाटील , राकेश पाटील, खांदेश्वर पाटील, राजेश ठाकुर, भगवान पाटील, संदिप पाटील , कल्पेश पाटील, हरिश्चंद्र पाटील, दिपक म्हात्रे, रूपम पाटील , भारत पाटील,राजेंद्र पाटील, निलेश ठाकूर, रनजित पाटील,कुमार पाटील, तीर्थस कडू, भूषण पाटील,प्रतिक पाटील , स्वप्निल घरत आदी गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांनी त्रिशुल ठाकूर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


थोडे नवीन जरा जुने