इसमाच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा शोध सुरुपनवेल दि . २१ ( संजय कदम ) : उपचारा दरम्यान एका इसमाचा एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध कळंबोली पोलीस करीत आहेत 

                   सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे ,रंगाने सावळा ,अंगाने सडपातळ ,चेहरा लांब ,कपाळ अरुंद ,नाक सरळ ,डोक्यावर केस काळे - पांढरे व बारीक केलेले ,कपाळाच्या दोन्ही बाजूला थोडे टक्कल ,नाक सरळ ,दाढी व मिशी बारीक आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .आर. चव्हाण यांच्या शी संपर्क साधावा . थोडे नवीन जरा जुने