नवघर पासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करण्याची जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांची मागणी.



 




उरण दि 23 ( विठ्ठल ममताबादे ) उरणमधील वाढते अपघात व अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिकांची संख्या लक्षात घेता भविष्यात कोणतेही अपघात होऊ नये. कोणत्याही व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होऊ नये यासाठी भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून नवघरपासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उडाणपूल आहे



 त्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, आमदार महेश बालदी, कार्यकारी अभियंता द्रोणागिरी-2 सिडको कार्यालय बोकडविरा,वरिष्ठ पोलिस निरिक्ष‌क उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (ट्रैफिक),सहाय्यक पोलिस कमिशनर झोन-2 आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली आहे.




उरण तालुक्यातील नवघर ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उड्डाणपूल मार्ग आहे त्या मार्गावरून अनेक अवजड वाहनांची बेकायदेशीर व अनधिकृत वाहतूक सेवा सुरु आहे. या अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक अवजड ट्रेलर, डम्पर तसेच इतर अति अवजड वाहनांची वर्दळ होत आहे.बाजूला फुंडे हायस्कूल व सिनीयर कॉलेज तसेच भागुबाई इंग्लिश मेडियम स्कूल, जेएनपीटी टाऊनशीप मधील शाळा असल्यामुळे व नवघर, कुंडेगाव पागोटे, जेएनपीटी टाऊनशीप, भेंडखळ या गावांना पनवेल उरण जाण्यासाठी सिडकोकडून पर्यायी रस्ता म्हणून त्या ब्रीजचे काम करण्यात आले आहे



.तरी भविष्यात अपघात व जिवित हानी होऊ नये. यासाठी त्या ठिकाणी पर्याय म्हणून हाईटगेज बसविण्यात आले होते.कालांतराने ते अपघातात तुटून गेले आहे. त्यामुळे अवजड वाहणांचा प्रवास विद्यार्थी वर्गांवर कधीही बेतू शकतो.तरी ते हाईटगेज त्वरित बसवून घेऊन अति अवजड वाहनांसाठी त्या ठिकाणी बंदी घालण्यात यावी व सामान्य नागरिक व शाळेतील मुले यांचे अपघात व जिवित हानी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी अन्यथा आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांचा उद्रेक होऊन रस्ता बंद आंदोलन पुकारावे लागेल व त्याठिकाणी उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास सिडको प्रशासन, ट्रॅफिक प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल



.म्हणून तातडीने या बाबीचे गांभीर्य ओळखून सिडको प्रशासन व ट्रॅफिक प्रशासनाने आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सिडको प्रशासन, ट्रॅफिक प्रशासन आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली आहे.



थोडे नवीन जरा जुने