सी डब्यु सी द्रोणागिरी नोड, पागोटे ता. उरण या कंपनीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ RMBKS युनियन स्थापन


सि डब्यु सी द्रोणागिरी नोड, पागोटे ता. उरण या कंपनीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ RMBKS युनियन स्थापनउरण दि 23(विठ्ठल ममताबादे )
सि.डब्यु.सी द्रोणागिरी नोड, पागोटे, ता. उरण, जि. रायगड या कंपनीमध्ये लोकल लेबर कामगारांतर्फे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियनची स्थापना करण्यात आली.सदर युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांनी केले व अध्यक्षता मार्गदर्शन, रायगड जिल्हा महासचिव तथा ‘खोतांचा कर्दनकाळ आप्पासाहेब नारायण नागू पाटील’ या पुस्तकाचे लेखक संजय धर्मा घरत यांनी केले. 


मालक आणि कामगार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे दोघांनीही एकमेकाला समजून घेणे गरजेचे असते. आपली युनियन 850 पेक्षा जास्त ट्रेडमध्ये काम करते, त्यामुळे आपल्याला कोणतिही अडचन आली तर युनियन आपल्या पाठीशी थंबीरपणे उभी राहील. असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात युनिट अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, उपाध्यक्ष नरेश पाटील, उपाध्यक्ष दिनेश पाटील, खजिनदार जितेंद्र पाटील, सचिव शुभम पाटील, सदस्य दौलत पाटील, योगेश पाटील, रवी तांडेल, सुरज ठाकूर, पंकज तांडेल, विजय पाटील, नितीकेश पाटील इतर कामगार तसेच कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष सुधीर ठाकूर, ट्रान्सइंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने