माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून मोकळ्या भूखंडाची साफसफाईमाजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून मोकळ्या भूखंडाची साफसफाई
पनवेल दि.०३ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग १८ मधील अशोक बाग समोरील मोकळ्या भूखंडावर पावसामुळे मोठे गवत आणि झाडे झुडपे वाढल्याने साप, मुंगूस आणि इतर जनावरांचा शिरकाव होत होता. माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून सदर भूखंडाची साफसफाई आणि सपाटीकरण करवून घेतले.


         प्रभाग १८ मधील अशोक बाग समोरील मोकळ्या भूखंडावर पावसामुळे मोठे गवत आणि झाडे झुडपे वाढली होती, त्यामुळे लगतच्या सोसायटी मध्ये साप, मुंगूस आणि इतर जनावरांचा शिरकाव होत होता. यामुळे सोसायटीच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


 सोसायटीच्या रहिवाशांनी कार्यक्षम माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि आपली समस्या सांगितली. यावर तत्परतेने विक्रांत पाटील यांनी जेसीबी लावून दलदलीचा काही भाग सोडून प्रथम झाडेझुडपे साफ करून घेतले. यासोबतच त्या भूखंडावरील मातीचा ढिगारा काढून जागेचे व्यवस्थित सपाटीकरण करून घेतले.
थोडे नवीन जरा जुने