सहकार भारती’ गृहनिर्माण सोसायटी पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर संपन्न







पनवेल दि.१८ (वार्ताहर) : ‘सहकार भारती’ गृहनिर्माण सोसायटी पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम पनवेल येथील गोखले हॉलमध्ये यशस्वीरित्या पार पडला. या मार्गदर्शन शिबिरास पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली अशा विविध विभागातून ७५ पेक्षा अधिक सोसायटीचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता. 



                     कार्यक्रमाची सुरुवात सहकार गीत व दीप प्रज्वल करून करण्यात आली. सहकार भारती रायगड जिल्हा अध्यक्ष व केशव स्मृती सहकारी पतसंस्था यांचे संस्थापक व अध्यक्ष अमित ओझे यांनी सहकार भारती पूर्ण भारतभर कशा पद्धतीने काम करते याबद्दलची उपयुक्त व मुद्देसुर माहिती दिली. सहकार भारती नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष व नवी मुंबई व्यापारी महासंघ संस्थापक महासचिव प्रमोद जोशी यांनी सहकार भारती कशाप्रकारे गृहनिर्माण संस्था आणि इतर संस्थेचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेते व ते सरकारपर्यंत पोहोचवते याचे मार्गदर्शन केले. 



या मार्गदर्शन शिबिरास प्रमुख वक्ते "सहकार भारती गृहनिर्माण प्रकोष्ट राष्ट्रीय प्रमुख व मुंबई ऑडिटर असोसिएशन अध्यक्ष ॲड. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "इमारतीचा पुनर्विकास" कशा पद्धतीने करावा याचे पूर्ण मार्गदर्शन करण्यात आले तसेच जमलेल्या सभासदांच्या प्रश्नांना कायदेशीर रित्या उत्तर देण्यात आली. या कार्यक्रमास सहकार भारती चे कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा गृहनिर्माण प्रकोष्ट प्रमुख व गव्हर्नमेंट सर्टिफाय ऑडिटर दिवाकर चव्हाण आणि नवी मुंबई महानगर जिल्हा गृहनिर्माण प्रकोष्ट प्रमुख संतोष कडू यांचेही संस्था नोंदणी ,निवडणूक प्रक्रिया, आणि लेखा परीक्षण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला पनवेल जिल्हा चे आर्किटेक अतुल म्हात्रे यांनीही उपस्थिती लावली व मोलाचे मार्गदर्शन केले. पनवेल मधील "केदार बिल्डकॉन" चे संचालक पियुष जोशी हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून उपस्थित होते. 




कार्यक्रमाची शेवटी व विशेष कामगिरी करणाऱ्या सोसायटीचे कौतुक करण्यात आले. ओम नमः शिवाय कलश सोसायटीने आपल्या सोसायटीमध्ये सांस्कृतिक उपक्रम व्यतिरिक्त समाजासाठी सार्वजनिक वाचनालय आवारात उभे करण्यात आले आहे. कलश सोसायटीचे अध्यक्ष देवीदास पाटील यांचा तुळशीचे रोप व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. असेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर सोसायटीने आपापल्या सोसायटीमध्ये नवीन नवीन समाज उपयोगी उपक्रम राबवावे असेही आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल जिल्हा महानगर महिला अध्यक्ष मनीषा म्हात्रे निमसे यांनी केले






. पनवेल जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, पनवेल जिल्हा सचिव विश्वास शिंदे, पनवेल जिल्हा सहसचिव विवेक महाजन, पनवेल जिल्हा गृहनिर्माण प्रकोष्ट प्रमुख प्रमोद जाधव, आणि पनवेल जिल्हा महिला अध्यक्ष व उरण संपर्क प्रमुख मनीषा म्हात्रे-निमसे त्यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण सोसायटी पदाधिकारी आणि सभासद यांचे मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या पार पडले.




थोडे नवीन जरा जुने