पागोटे गावात विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने इलेक्ट्रिक उपकरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.








15 दिवसाच्या आत जीर्ण झालेले विद्युत पोल व खराब झालेल्या विदयुत वायर न बदलल्यास भार्गव पाटील यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा




उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पागोटे गावात मोठया प्रमाणात विद्युत पोल हे जीर्ण(खराब )झाले आहेत. तसेच विद्युत पुलावरील जीर्ण झालेले विद्यूत वायर बदलून नविन विदयुत वायर टाकण्यात यावे असे अनेक दिवसापासून ग्रामस्थांची मागणी होती.ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेउन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्याक्ष अँड भार्गव दामाजी पाटील यांनी उरण तालुक्यातील पागोटे गावातील सर्व जीर्ण झालेले विदयुत पोल व विद्युत वायर बदलण्यात यावे अशी मागणी करत तसा पत्रव्यवहार उरणच्या महावितरण विभाग कार्यालयात केला होता परंतु




 महावितरण विभाग कार्यालयामार्फत भार्गव पाटील यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळ्यात कोणतेही जिवितहानी होउ नये व दिनांक 13/4/2023 रोजी पागोटे गावात शॉर्ट सर्किट होउन फॅन, टीव्ही, मिक्सर आदी विविध विद्युत उपकरणाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची परत पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने दिनांक 17/4/2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील यांनी उरण कोटनाका येथील महावितरण विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांची भेट घेतली.महावितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सोनावले हे शासकीय कामानिमित्त बाहरे असल्याने त्यांच्यांशी फोनवर संपर्क साधून सदर समस्या भार्गव पाटील यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली


.कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी श्री. जाधव यांना निवेदन देऊन पागोटे गावची वीजेची समस्या सोडविण्याची मागणी यावेळी ऍड.भार्गव पाटील यांनी जाधव याच्याकडे केली.सदर अर्जाची प्रत पोस्ट द्वारे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनाही देण्यात आल्याची माहिती भार्गव पाटील यांनी यावेळी दिली.जर पंधरा दिवसाच्या आत समस्या सूटली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भार्गव पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. सर्व बाबींचा, समस्यांचा विचार करता पागोटे गावातील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सोनवले यांनी अँड भार्गव पाटील यांना दिले आहे.


थोडे नवीन जरा जुने