तळोजात रात्रीच्या वेळेस फिरणार देखरेख व्हॅन


तळोजात रात्रीच्या वेळेस फिरणार देखरेख व्हॅन

मुंबई: तळोजा येथे रात्रीच्या वेळेस कोणती कंपनी प्रदुषण करते हे शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखरेख व्हॅन या भागात एक महिना ठेवावी. ही व्हॅन रात्रीच्या वेळेस तळोजा परिसरात गस्त घालेल. कोणती कंपनी तळोजात प्रदुषण करते याची माहिती या व्हॅनने सादर करावी, असे आदेश लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.लोकायुक्त कानडे यांच्या आदेशानुसार तळोजा येथील प्रदुषण रोखण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. आयआयटी पवईचे प्रोफेसर अभिषेक चक्रबाती, मुंबई प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सह संचालक डॉ. व्ही. एम. मोटगरे, नवी मुंबई प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डी. बी. पाटील, सचिन अडकर, तळोजा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, हे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती तळोजातील प्रदुषणाचा अभ्यास करणार आहे. हवेचे प्रदुषण कसे रोखता येईल यासाठी ही समिती उपाय सुचवणार आहे.हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी राज्य शासनाने देखरेख कक्ष वाढवण्याची गरज आहे. पर्यावरण मंत्रालयाने तत्काळ देखरेख कक्ष वाढवावेत, अशी सुचना लोकायुक्त कानडे यांनी केली आहे. ज्या कंपन्या प्रदुषण करत असतील त्यांना कारणे द्या नोटीस द्यावी. कंपन्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, कंपनीला टाळे ठोकणे, बँक खाती गोठवणे, अशा प्रकारची कारवाई प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर करावी, अशीही सूचना लोकायुक्त कानडे यांनी केली आहे..डम्पिंग ग्राऊंडच्या ५०० मीटरच्या हद्दीत कोणत्याही व्यावसायिक आणि रहिवाशी बांधकामाला परवानगी देता येत नाही. तरीही पनवेल येथील डम्पिंग • ग्राऊंडच्या हद्दीत बांधकामे सुरु आहेत. अशा बांधकमांवर काय कारवाई केली याची माहिती सादर करण्याचे आदेश लोकायुक्त कानडे यांनी पनवेल महापालिकेला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी २ जुनला होणार आहे..याप्रकरणी राजीव सिन्हा, सुनील पाटील आणि समीर पाटील यांनी लोकायुक्तांकडे अर्ज केला आहे. तळोजा परिसरातील केमिकल कंपन्यांमधून रात्रीच्या वेळेस विषारी वायू सोडला जातो. या परिसरात डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथे कचरा जाळला जातो. त्यामुळेही बाबू प्रदूषण होते. वायू प्रदूषणामुळे श्वसनास त्रास होतो, असा दावा अर्जांत करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने