पनवेल महापालिकेने घेतले मॉकड्रिल





पनवेल महापालिकेने घेतले मॉकड्रिल

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील ३२ खाजगी रुणालये व महापालिकेच्या कोविड समर्पित रुग्णालयांतील उपाययोजनांचे महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने नुकतेच 'माकडील' ( संकट कालीन बचाव प्रशिक्षण) घेण्यात आले.



पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील एकुण ३२ खाजगी रुग्णालये तसेच कळंबोली येथील महापालिकेच्या कोविड समर्पित केंद्राचे मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी याठिकाणी आरोग्य सुविधांची उपलब्धता, अलगीकरण खाटांची क्षमता, आयसीयू व ऑक्सीजन सुविधायुक्त खाटा, व्हेटिलेटर खाटा, ऑक्सीजन सिलेंडर, ऐनवेळी लागणारी औषधे,



 इंजेक्शन्स, पीपीई किट, जनरल बेड्स मनुष्यबळ, यंत्रसामुग्री या सर्वांची पहाणी करण्यात आली. तसेच कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचण्या व अॅण्टीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने