जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके खांदाकॉलनीतजेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके खांदाकॉलनीत* 


 *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून व्याख्यानाचे आयोजन* 

 गोल्ड मेडलिस्ट, पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेचे उपाध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य म्हणून बाबासाहेबांचे दुर्मिळ असेअनेक ग्रंथ प्रकाशित करण्यात महत्वाचे योगदान असलेले अभ्यासू विचारवंत, संशोधक, अनेक
 पुस्तकांचेलेखक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते हरी नरके पनवेलकरांना अभिवादन करणार आहेत. आंबेडकर जयंती साजरी करीत असताना केवळ आनंदोत्सव साजरा न करता बाबासाहेबांचे विचार ऐकण्याची संधी नागरिकांना मिळावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने व्याख्यानाची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. हरी नरके यांच्या व्याख्याना साठी जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित राहवे म्हणून कामगार नेते महादेव वाघमारे यांनी आवाहन केले आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कुटुंबासहित विचारवंताचे विचार ग्रहण करण्यासाठी व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय सायंकाळी 6 वाजता तक्षशिला बुद्धविहार येथून डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार 13 एप्रिल रोजी  महिलांसाठी विविध स्पर्धांचेतसेच मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. खांदा कॉलनीत विविध संघटना, संस्था एकत्र येऊन जयंती महोत्सव समिती स्थापन केली आहे. मागील वर्षी खांदा कॉलनीमधील भीम अनुयायांनी एकत्र येऊन आंबेडकरी अनुयायांनी एकीची ताकद खांदा कॉलनीला नव्हे संपूर्ण पनवेलला दाखवून दिली. यंदा गतवर्षी पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येवून भव्यदिव्य जयंती साजरी करू असे आवाहन करण्यात आले आहेथोडे नवीन जरा जुने