महाराष्ट्र शाहिर








कालच पाहिला... अप्रतिम... नव्या पिढीने संयम शिकण्याकरीता, महाराष्ट्र संस्कृती अनुभवण्याकरीता, शाहिरीचा आनंद घेण्याकरीता, स्वातंत्र लढ्यातील शाहिरांच योगदान जाणण्याकरीता, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील पोवाड्यांनी लोकांमद्धे संचारलेला अंगार पाहण्याकरीता आणि जुन्या पिढीने त्यावेळचे मंतरलेले दिवस पुन्हा आठवण्याकरीता हा चित्रपट पहायलाच हवा... 



केदार शिंदे यांच उत्कृय्ट दिग्दर्शन, अजय-अतुल यांच प्रसंगांना साजेस आणि शाहिरांच्या गाण्यांना अप्रतिम साज चढवणारं संगित, कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला... तरीही नैसर्गिक सौंदर्य जपलेला चित्रपट म्हणजे *"महाराष्ट्र शाहिर"...* 



महाराष्ट्र शाहिर कृष्णराव साबळेंना पडद्यावर उभ करण्याच शिवधनुष्य केदार शिंदे-अंकुश चौधरी या जोडीने लिलया पेललं याबद्दल दोघांचेही मनापासुन अभिनंदन... शेवटपर्यंत अंकुश चौधरींनी प्रेक्षकांना स्वतःवरच्या नजरा दुसरीकडे वळवण्याची संधीही दिलेली नाही. खरतर अंकुश सारखा स्टाईलिश अभिनेता शाहिर साबळेंच्या भुमिकेत चपखल बसेल हि कल्पना करणेच अशक्य पण केदार शिंदेंनी ते करून दाखवलं.... केदारजींचा विश्वास अंकुशने शतपटीने सार्थ ठरविला... आमचा सुपरस्टार नुसता स्टाईलिश नाही तर कोणतीही भुमिका सहज पेलु शकतो हेच परत एकदा अंकुशने सिद्ध केले... अंकुशच्या चेह-यावरच नैसर्गिक आणि निखळ हास्य चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ताजीतवानी करते... 



हे सर्व लिहीताना जर भानुमतीजींची भमिका करणारी सना शिंदे, रंगभुषाकार तसेच वेशभुषाकारांचे अभिनंदन केले नाही तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच होईल... त्यांच्याशिवाय केदारजींना हा चित्रपट सदाबहार करताच आला नसता. 

मस्त... जबरदस्त... सॉलिड... *महाराष्ट्र शाहिर...* 

*योगेश जनार्दन चिले* 
*प्रवक्ता, मनसे*


थोडे नवीन जरा जुने