अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अमित भगत यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेटअलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अमित भगत यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या उत्साहात, शांततेत संपन्न झाली.रायगड जिल्ह्यातील अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत गटातून 161 मतांच्या फरकाने दणदणीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उपतालुका संघटक व चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अमित भगत यांनी रविवार दिनाकं 30 एप्रिल 2023 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित संचालक अमित भगत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी चाणजे उपविभागप्रमुख रवी पाटील, माजी सरपंच मंगेश थळी, करंजा उपशाखाप्रमुख राजेंद्र पाटील, चंदन कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील,संकेत कोळी, कल्पेश भोईर, सागर डाऊर, निवृती कोळी, नितेश पाटील, दिवेश ठाकूर, विजय म्हात्रे, शब्बीर मंचेकर, परेश थळी, मयुरेश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होतेथोडे नवीन जरा जुने