लिविंग वेजेस ही बी. एम. एस. ची अग्रगण्य मागणी

लिविंग वेजेस ही बी. एम. एस. ची अग्रगण्य मागणी 

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे ) किमान वेतन नव्हे तर लिविंग वेजेस ही भारतीय मजदूर संघाची अग्रगण्य मागणी आहे. कामगारांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर जगण्याकरिता आवश्यक असे वेतन मिळणे आवश्यक आहे, त्याकरिता लिविंग वेजेस मिळावे हि केंद्र सरकारकडे भारतीय मजदूर संघाची मागणी आहे. असे विचार भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमते यांनी व्यक्त केले. भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय महामंत्री पदी रवींद्र हिमते व भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ प्रभारी म्हणून चंद्रकांत (अण्णा) धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल भारतीय मजदूर संघ रायगड ज़िल्हा व भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ यांच्या वतीने जाहीर सत्कार जे. एन. पी. ए. टाउनशिप येथे आयोजित केला होता.भारत मातेचे वैभव कायम ठेवण्याचे काम भारतीय मजदूर संघ करीत असून, कामगारांचा संघटनेवरचा विश्वास हीच संघटनेची ताकद आहे म्हणूनच आज देशभरात संघटने ४ कोटी सभासद आहेत. असे विचार रवींद्र हिमंते यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ प्रभारी चंद्रकांत (अण्णा) धुमाळ यांनी बोलताना ईशारा दिला कि, कामगार कायद्यातील चांगल्या सुधारणांचे स्वागत करू, मात्र कामगार विरोधी धोरणांना रस्त्यावर उतरून विरोध करू व्यक्त केले. यावेळी कामगार नेते सुरेश पाटील, 
 जे. एन. पी. ए. विश्वस्त रवींद्र पाटील यांनी आपापले विचार व्यक केले. भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय महामंत्री पदी रवींद्र हिमते व भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ प्रभारी म्हणून चंद्रकांत (अण्णा) धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी केले तर आभार जनार्दन बंडा यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर मुंबई पोर्ट मजदूर संघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, सरचिटणीस दिगंबर चौगुले, सुधीर तिवरेकर, मधुकर पाटील, आर. पी. व्हिटील उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने