अंबादेवी कबड्डी संघ डोंगरी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न.
अंबादेवी कबड्डी संघ डोंगरी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न.

 
माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेवशेठ घरत यांची प्रमुख उपस्थिती.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )अंबादेवी कबड्डी संघ डोंगरी यांच्या विद्यमाने शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी उरण तालुका मर्यादित पुरुष गटाचे कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते, या कबड्डी सामन्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख कामगार नेते महादेव घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यातील कबड्डी संघाने सहभाग घेतला, सर्व मान्यवरांचे अंबादेवी कबड्डी संघाचे कर्णधार मंगेश घरत व प्रशिक्षक आत्माराम घरत यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. 

  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई घरत ,माजी सरपंच निलेश घरत, अनंत भगत,डोंगरी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष रुपेश घरत,ग्रामपंचायत सदस्य किरण घरत, नटेश पाटील,तृप्ती घरत, किरण घरत,राकेश पाटील, राजेंद्र घरत ,अनिल घरत किशोर घरत, अनंत घरत, मुकुंद घरत, भालचंद्र घरत, कमळाकर घरत,सचिन पाटील, कल्पेश ठाकूर, हरेश घरत, गणेश म्हात्रे, परेश पाटील, महेश घरत, भारत म्हात्रे, बाबुराव पाटील,हेमंत घरत व मान्यवर उपस्थित होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंबादेवी कबड्डी संघाच्या सर्व खेळाडूंनी मेहनत घेतली.


थोडे नवीन जरा जुने