पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष इक्बाल काझी पॅनेलची बाजी





पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष इक्बाल काझी पॅनेलची बाजी 
पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष इक्बाल काझी पॅनेलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत इकबाल काझी यांनी ८०८ मतांसह सलग तिसऱ्यांदा पहिल्या पसंतीची मते घेतली आहे. 






            पनवेल शहरात शालेय गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रकिया मोठ्या उत्साहात पार पडली. त्रैवार्षिक असणाऱ्या या निवडणुकीत इकबाल काझी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पॅनेल विजयी झाले आहे. सलग तिसऱ्यांदा पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत इकबाल काझी यांचे पॅनल विजयी झाले आहे. आता हे पॅनल २०२३-२०२६ पर्यंत पनवेल एज्युकेशन सोसायटीचे काम पाहणार आहे. पनवेल एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यक्ष इकबाल काझी यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले आहे



. इकबाल काझी यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या फीची अपेक्षा न करता ४ हजार मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. तसेच तीन शाळांमध्ये डिजिटल एज्युकेशन सुरु केले असून शाळेत उच्चदर्जाच्या शिक्षकांची भरती केली आहे. तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम इकबाल काझी यांनी केले आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून मतदारांनी त्यांना पुन्हा पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत विजयी केले आहे. या निवडणुकीत एकूण १५०१ मतदारांपैकी ९७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये इकबाल मोहम्मद हुसेन काझी यांनी ८०८ मतांसह १ ला क्रमांक मिळवला. 



तर निसार अब्दुल हमीद पटेल ७७८ मतांसह २ रा क्रमांक, अझीम शब्बीर मुल्ला ७७३ मतांसह ३ रा क्रमांक, नवीद अब्दुल कादीर पटेल ७१७ मतांसह ४ था क्रमांक, साजिद नासिर पटेल ७६६ मतांसह ५ वा क्रमांक, माझ शहानवाज मुल्ला ७४६ मतांसह ६ वा क्रमांक, अलीम अमीरुद्दीन पटेल ७१९ मतांसह ७ वा क्रमांक, अब्दुल मुकीद अब्दुल लतीफ काझी ७१२ ८ वा क्रमांक, असिफ हसनमिया करेल ७०९ मतांसह ९ वा क्रमांक, झुबेर अब्दुल रझाक पिट्टू ७०७ मतांसह १० वा क्रमांक, मोहम्मद नूर हसनमिया पटेल ७०२ मतांसह ११ वा क्रमांक, जव्वाद अब्दुल मुकिद काझी ६८० मतांसह १२ वा क्रमांक, आफताब खालिद पिंटू २१५ मत १३ वा क्रमांक, तारिक मोहम्मद गौस मास्टर १६८ मतांसह १४ वा क्रमांक, कादिर हसनमिया करेल १४९ मतांसह १५ वा क्रमांक, इम्रान अब्दुल कादिर पटेल ७२ मतांसह १६ वा क्रमांक मिळवला आहे.



 इकबाल काझी यांच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले.



थोडे नवीन जरा जुने