उर्मिला पडवळ ठरल्या ओरियन मॉलच्यासिंगापूर टूरच्या विजेत्या


उर्मिला पडवळ ठरल्या ओरियन मॉलच्यासिंगापूर टूरच्या विजेत्या
*मॉलमध्ये येऊन शॉपिंग करणे सोपे असते परंतु मॉल चालवणे कठीण - सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे* पनवेल दि.१ (संजय कदम) : मॉलमध्ये येऊन शॉपिंग करणे सोपे असते परंतु मॉल चालवणे कठीण असते मात्र ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी हे मॉल उत्तमरित्या फक्त चालवत नसून अश्या प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राहकांची परतफेड करत असतात असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले आहे. पनवेलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची पहिली पसंती असलेले ओरियन मॉलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेचा चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते ओरियन मॉलमध्ये काढण्यात आला. यामध्ये उर्मिला पडवळ ह्या भाग्यवान ठरल्या आहे. त्यांना परिवारासह आंतरराष्ट्रीय सिंगापूर टूरची संधी प्राप्त झाली आहे. 
तर वंदना पांडे ह्या ओला एस वन इलेक्ट्रिक बाइकच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. 
                  पनवेल मधील ग्राहकांची पहिली पसंती असलेले ओरियन मॉलच्या माध्यमातून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर आणि इतर भेटवस्तूची जोड मिळत असते. यावर्षी ओरियन मॉल आपला सातवा वर्धापन दिन साजरा करत आहे. या सात वर्षात ओरियन मॉलने पनवेलची एक ओळख म्हणून नाव कमावले आहे. दरवर्षी मॉलतर्फे वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. यंदाच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त मॉलच्या वतीने खरेदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा लकी ड्रॉ हास्यजत्रा फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते ओरियन मॉलमध्ये काढण्यात आला
. यामध्ये उर्मिला पडवळ यांना सिंगापूर टूरची सुवर्णसंधी मिळाली आहे. तर वंदना पांडे यांनी ओला एस वन इलेक्ट्रिक बाइकच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या. यावेळी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया, मॉलचे डायरेक्टर मनन परुळेकर, आशुतोष गवळी, प्रशांत पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग उपस्थित होते. दरवर्षी अशाप्रकारचे उपक्रम राबवत असल्यामुळे ग्राहकांनी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर व मनन परुळेकरसह ओरियन मॉलचे कौतुक केले.


थोडे नवीन जरा जुने