स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतली पेण विभागीय कार्यकर्त्यांची बैठक
पनवेल दि.२६ (संजय कदम) : पेण मधील कासू गडब विभागामध्ये येत्या 30 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. तसेच या विभागातील असंख्य कार्यकर्ते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. यानिमित्त या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पेण विभागातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अंबरनाथ येथील घटनेचा निषेध करण्यात आला.
पेण येथील रेस्ट हाऊस मध्ये हि बैठक संपन्न झाली. त्याचप्रमाणे २० मे रोजी पेण शहर यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महेश साळुंखे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, शहर अध्यक्ष नागेश सुर्वे, समीर घायपाले, विनोद जोशी, इत्यादींनी घेतली आहे. दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आयोजित जयंती महोत्सवाला महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Tags
पनवेल