कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू तर 25 जण जखमीकर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू तर 25 जण जखमी
पनवेल दि.25(संजय कदम): मुंबई-गोवा महामार्गवरील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 25 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच 09 इएम 9282) ही निघाली होती. दरम्यान कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पटली झाली. या बसमधून 38 प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण 40 जण प्रवास करत होते. या अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 22 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दिप्तेश मोरेश्‍वर टेमघर (31 रा.अष्टमी, ता.रोहा) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांमध्ये नामदेव पवार (40 रा.विलेपार्ले), अर्चना सुतार (30 रा.कामोठे), चिन्मय सुतार (12 रा.कामोठे), पुरुषोत्तम मेहता (77 रा.गोरेगाव), रणधिर भोईर (44 रा.जांभूळटेप), सुजित मोरे (51 रा.महाड), मुक्तार इस्माईल कातील (70 रा.बोर्ले), भौमिक नामदेव पवार (32 रा.महाड) तसेच पेण हॉस्पिटल येथे कुंदा सावंत (58 रा.कशेडी), कुंजलता पाटील (53 रा.गोरेगाव), विशाखा सपकाळ (35 रा.आमडोशी), विजय सपकाळ (48 रा.आमडोशी) तर कामोठे एमजीएम रुग्णालयात चेतन आंबावले (33 रा.साईनगर, पनवेल), तनुष्का बोंबले (11 रा.कामोठे), अनुष्का बोंबले (12 रा.कामोठे), कबीर भोईर (58 रा.विर), शोभा शेलार (48 रा.महाड), नईम नसीर खान (26 रा.गोरेगाव), पुर्विल शिंदे (16 रा.सुधागड), लता तळेगावकर (42 रा.पारगाव, पनवेल), मितेश राणे (20 रा.नालासोपारा), विस्मय शिंदे (15 रा.सुधागड), मोहम्मद तौकिब सुर्वे (35 रा.नालासोपारा), तेजश्री वाडवळ (33 रा.माणगाव), राजश्री सपकाळ (60 रा.महाड) हे जखमी उपचार घेत आहेत. तर बस चालक हर्षल तायडे (38 रा.नागपूर) व कंडक्टर राजेश मेहता (55 रा.चारकोप, मुंबई) हे सुखरुप बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पथक तसेच पळस्पे वाहतुक शाखेच्या वरिष्ट पोलिस निरीक्षक स्मीता जाधव व त्यांचे पथक घटना स्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरु केले. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याचा मार्गावर एका रेनॉल्ट्स कंनीच्या काराचाही अपघात झाला होता. त्यामुळे मुबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालीका सुरु आहे. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. 
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच एमजीएम कामोठे येथे पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली. तसेच तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेवून आवश्यक असलेल्या औषधोपचाराची माहिती घेतली आहे.


थोडे नवीन जरा जुने