कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू तर २२ जण जखमी






कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू तर २२ जण जखमी
पनवेल दि.२५(संजय कदम): मुंबई-गोवा महामार्गवरील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.



        पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच ०९ इएम ९२८२) ही निघाली होती. दरम्यान कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पटली झाली. या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते.



 या अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पथक तसेच पळस्पे वाहतुक शाखेच्या वरिष्ट पोलिस निरीक्षक स्मीता जाधव व त्यांचे पथक घटना स्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरु केले.



 यावेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याचा मार्गावर एका रेनॉल्ट्स कंनीच्या काराचाही अपघात झाला होता.



 त्यामुळे मुबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालीका सुरु आहे. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. 




थोडे नवीन जरा जुने