दोन महिलांनी केली लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स साडी दुकानातून लंपास

दोन महिलांनी केली लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स साडी दुकानातून लंपास
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : साडीच्या दुकानात १ लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    
                विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान आहे. या दुकानाच्या समोर मारुती वॅगन आर गाडी उभी राहिली त्यातून २ महिला व त्यांच्यासोबत ३ लहान मुले दुकानामध्ये आले. साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने हि लोक दुकानामध्ये आली व दुकानामध्ये असलेली पर्स घेऊन कारमध्ये बसून निघून गेली. या पर्समध्ये रामाणे यांचे रोख रक्कम १ लाख रुपये, एटीएम कार्ड , आधार कार्ड, पॅन कार्ड आदी वस्तू होत्या याबाबत रोशनी रामाणे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम ३८०/३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे व अधिक तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत. दरम्यान ठिकठिकाणी पोलीस चेकिंग असतानाही दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक भयभीत झाले आहेत.थोडे नवीन जरा जुने